वोडाफोन-आयडिया लवकरच बंद होणार?

वोडाफोन-आयडिया लवकरच बंद होणार?

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती वोडाफोन-आयडिया कंपनी बंद होणार का याची. अशात आता एकत्र आलेल्या वोडाफोन-आयडिया या कंपनीचा पाय आणखीन खोलात गेलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय. याला कारण ठरतोय न्यायालयाच्या आदेशानंतर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युमिकेशन ने दिलेले आदेश. टेलिकॉम कंपन्यांकडे तब्बल 1.47 लाख कोटी रुपये थकीत आहेत. अशात हे पैसे शुक्रवार रात्रीपर्यंतच AGR देण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे हा वोडाफोन-आयडियासाठी मोठा धक्का मानला जातोय.
 

1.47 लाख कोटींपैकी 92,642 कोटी रुपये लायसन्स फी तर 55,054 कोटी रुपये स्पेक्ट्रम चार्जेस आहेत. एअरटेलची थकीत रक्कम 35 हजार कोटी रुपये तर व्होडाफोन आयडियाची थकीत रक्कम  53 हजार कोटी रुपये आहे

टेलिकॉम विभागाकडून आलेले आदेश अत्यंत कठोर असल्याची भावना वोडाफोन-आयडिया व्यक्त केली जातेय. कन्सल्टन्ट फर्म फार्म कॉम चे संचालक महेश उप्पल यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. टेलिकम्युमिकेशन विभागाच्या निर्णयानंतर भारतात दोनच दूरसंचार कंपन्या उरतील असा अंदाज त्यांनी लावलाय. भारतात सध्या वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या कंपन्या आहेत. या तिघांमध्ये मोठी चढाओढ आहे. सरकारने जर दीर्घ काळाची समस्या लक्षात घेता नियमांमध्ये बदल केलेत तरच काहीतरी होऊ शकतं असं देखील उप्पल म्हणालेत. 93 हजार MTNL आणि BSNL कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेल्या अर्जावरून याची कल्पना येऊ शकते, असं देखील महेश उप्पल म्हणालेत. याआधी डिसेंबर महिन्यात वोडाफोन-आयडियाचे चेअरमन कुमार मंगल बिर्ला यांनीही दूरसंचार कंपन्या बंद होण्याची भीती व्यक्त केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 23 जनेवरीबपर्यंत दूरसंचार कंपन्यांना थकीत पैसे भरायचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान तारीख वाढवून मिळण्यासाठी वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांनी पुन्हा न्यायालयात विनंती अर्ज केला होता. यावेळी सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत पैसे का भरले नाहीत आणि कंपन्यांवर कारवाई का केली जाऊ नये असे प्रश्न विचारले होते.

Web Title: telecom companies in india gets notice to clear AGR dues vodafone idea airtel in trouble

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com