रेल्वेत होणार नोकर कपात - आर्थिक अडचण की खासगीकरणाचा डाव? 

रेल्वेत होणार नोकर कपात - आर्थिक अडचण की खासगीकरणाचा डाव? 

भारतीय रेल्वेमध्ये आता नोकर कपातीची शक्यता आहे. तशा आशयाचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. आणि याच्या पहिल्या टप्प्यात रेल्वेतल्या कामगार नेत्यांवर संक्रात येणारए.

देशात सर्वात मोठे वाहतुकीचं जाळं भारतीय रेल्वेचं आहे. मात्र खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी अशी रेल्वेची सद्यस्थिती आहे. परिणामी भारतीय रेल्वेची घसरलेली आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी दिल्लीत ‘परिवर्तन संगोष्ठी’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रेल्वेत कामगार कपातीचं सूतोवाच करण्यात आलंय. 

भारतीय रेल्वेत प्रत्येक 24 कर्मचाऱ्यांमागे एक कर्मचारी हा कोणत्या ना कोणत्या रेल्वे युनियनचा नेता आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वेत सुमारे 50 हजार रेल्वे कर्मचारी आणि 250 रेल्वे अधिकारी कामगार नेते म्हणून वावरतायत. विशेष म्हणजे आपलं काम सोडून हे स्वयंघोषित नेते युनियनच्या कामात व्यस्त असल्याची, धक्कादायक बाब समोर आलीय.

या माहितीची गंभीर दखल रेल्वेमंत्र्यांनी घेतली असून अशा बिनकामी आणि फुल्ल पगारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्तावच तयार करण्यात आला असून पुढील तीन वर्षांत एकूण कामगारांच्या 10 टक्के आणि त्यानंतर टप्याटप्प्याने 50 टक्के कामगारांची कपात करण्यात येणार आहे. मात्र हा रेल्वेच्या खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप कामगारांनी केलाय.
सध्या तरी रेल्वेतले बिनकामाचे कामगार नेते रेल्वे प्रशासनाच्या रडारवर असले तरीही रेल्वेची ढासळती आर्थिक स्थिती पाहता भविष्यात इतरही कामगारांच्या नोकऱ्यांवर संक्रांत येऊ शकते.

Web Title - there will be cost cutting in railway 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com