दहावीच्या 20 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के गुण

दहावीच्या 20 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के गुण

आज राज्यभरात SSC चे निकाल जाहीर झालेत. दहावीच्या आज झालेल्या निकालाचं वैशिष्ट म्हणजे 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेत. लातूरमधल्या तब्बल 16 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. नियमित केलेला अभ्यास आणि शिक्षकांनी घेतलेल्या कष्टामुळं हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिलीय.

"दहावी आहे म्हणून अनेकजन टेंशन घेतात; पण मी अजिबात टेंशन घेतले नाही. शाळा-क्लासमधील अभ्यासाबरोबरच ‘सेल्फ स्टडी’वर अधिक भर दिला. त्यामुळेच शंभर पैकी शंभर गुण मिळवता आलेत" अशी भावना केशवराज विद्यालयातील विवेक भरत क्षीरसागर या विद्यार्थ्याने दिलीय. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय.   
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com