'राजीनामा देतो, फेरनिवडणूक घ्या'; EVM वरुन उदयराजेंचा संताप

'राजीनामा देतो, फेरनिवडणूक घ्या'; EVM वरुन उदयराजेंचा संताप

EVM वरुन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झालेत. राजीनामा देतो, निवडणूक बॅलेटपेपर घ्या असं खुलं आव्हानच उदयनराजे भोसलेंनी दिलंय. ईव्हीएम घोटाळा झाल्याच्या आरोपाचा उदयनराजेंनी पुनरुच्चार केलाय. ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत उदयनराजेंनी निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढलेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही उदयनराजेंनी ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा ईव्हीएमवरुन उदयनराजेंनी संताप व्यक्त केलाय. उदयनराजेंच्या मागणीची निवडणूक आयोग दखल घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com