...तर उदयनराजे मिशा आणि भुवया काढणार

...तर उदयनराजे मिशा आणि भुवया काढणार

सातारा लोकसभेचं बॅलेटवर परत मतदान घ्यावं या मागणीसाठी उदयनराजे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतायत. संपूर्ण निवडणूक माझ्या खर्चाने करतो आणि जर फरक नाही पडला तर मिशा  काढीन आणि भुवया पण भादरवीन या शब्दात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी निवडणुक आयोगाला आव्हान दिले.

ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत 376 पेक्षा अधिक मतदारसंघातील मतांमध्ये तफावत आढळून आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये राज्यातदेखील अनेक पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. आता सातारा लोकसभेतून विजयी झालेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही मतमोजणीतील फरकावरून पत्रकार परिषद घेत चौफेर टीका केली.

लोकसभा मतदारसंघात आपल्याला साडेतीन ते पावणेचार लाखांचे मताधिक्य आहे. मी राजीनामा देतो. पुन्हा फेरमतदान होऊ दे मी तितक्याच मताधिक्कयाने निवडून येईन, असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का? असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप उदयनराजे यांनी करत ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती उखडून टाकायला हवी असंही म्हटलंय. 

देशभरात अनेक मतदारसंघांत घोळ झाल्याचा संशय आहे. आयोगाने पोर्टलवरून आकडेवारी हटवल्याने संशय आणखीनच वाढला आहे. यामुळे या विषयावर गांभीर्याने चर्चा होणं गरजेचं असून निवडणुक आयोगानं  चॅलेंज स्वीकारून जनतेच्या शंकांचं निरसन करावं अन्यथा लोकंच या मशीन फोडतील, त्यांना कसं अडवणार असा सवाल ही उदयनराजे भोसले यांनी. 

Webtitle : marathi news udayan rajes open challenge to election commission of India

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com