उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या आमदारांशी काय बोलले?

उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या आमदारांशी काय बोलले?

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील नाट्यावर मुंबईतील रेनेसाॅं या पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. सत्तेचा घोडेबाजार टाळण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना मुंबईतील रेनेसाॅं या पाचातारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. अशातच आज सकाळीच शरद पवार हे रेनेसाॅं हॉटेलमध्ये आमदारांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यानी राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधला. गेल्या दोन दिवसापासून जे राजकीय नाट्य घडतंय, याबाबत आमदारांना देखील संभ्रम अवस्थेत आहेत. अशातच आता पक्ष नेतृत्वाने याबाबत आता आमदारांशी थेट संपर्क साधायला सुरवात केल्याचं पाहायला मिळतंय.

शरद पवार यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राष्ट्रवादीच्या आमदारांशी आज संवाद साधला. एकंदरच सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी कशा प्रकारे पुढील पावलं उचलणार याबाबत आमदारांची संवाद साधला गेल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. 


शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल अर्धा ते पाउण तास चर्चा देखील झाली. चर्चेनंतर आता जयंत पाटील हे देखील शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. जयंत पाटील यांनी आज अजित पवारांची भेट घेऊन त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अजित पवारांची नक्की सध्याची  परिस्थितीत काय भूमिका आहे, याबद्दल सर्व माहिती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता एकत्रित येत पत्रकारांसमोर येऊ शकतात. दरम्यान काल उपमुख्यमंत्रिपदाची राष्ट्रवादीचे माजी गटनेते अजित पवार यांनी शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आल्याचं पाहायला मिळालं. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अजित पवार यांची NCP च्या गटनेता पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या त्यांच्या जागी जयंत पाटील आता सर्व सूत्र हाताळणार आहेत. 

दरम्यान काल झालेल्या घडामोडी, कॉंग्रेस , शिवसेना आणि राष्ट्रवादीतर्फे सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका यावर सर्व आमदारांना माहिती देण्यासाठी शर पवार यांनी आमदारांची भेट घेल्याचं बोललं जातंय. इकडे शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतील लालिल हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. या ही ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे हे ठाण मांडून बसलेले आपल्या पाहायला मिळाले. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे ललितमध्ये शिवसेना आमदारांशी बोलणार असल्याचं समजतंय.  

दरम्यान आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठकीनंतर, चर्चेनंतर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्रित येत कोणत्या गोष्टींचा उलगडा करणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, 

Webtitle : uddhav thackeray met NCP mlas in renaissance hotel

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com