'कोरोनामागे अमेरिकेच्या सैन्याचा हात?'

'कोरोनामागे अमेरिकेच्या सैन्याचा हात?'

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. 

कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून अमेरिका आणि चीन या दोन्ही देशात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अमेरिकेने कोरोनाच्या मुद्यावरून चीनला धारेवर धरले होते. वुहानमध्ये कोरोना सर्वात जास्त प्रमाणात पसरला आहे. त्यावरून आता कोरोनामागे अमेरिकेच्या सैन्याचा हाथ असल्याचा संशय चीनकडून व्यक्त केला जात आहे. तसेच चीनमुळेच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी चीनवर टीका केली. ते म्हणाले, कोरोना व्हायरसवर चीनने खूप उशीरा उपाययोजना केल्या. हेच कारण आहे दोन महिने कोरनाचा संसर्ग होण्याचा. जर दोन-तीन महिन्यांपूर्वी समजले असते तर उपाययोजना करणे सोपे झाले असते.

Web Title: marathi news  'US armies behind corona?'

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com