वर्षा बंगलाच्या त्या खोलीत कोणी लिहिला उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर?

वर्षा बंगलाच्या त्या खोलीत कोणी लिहिला उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर?

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सध्या सोशल मिडीयावरून आपली नाराजी आणि उद्विग्नता सातत्याने मांडत आहेत. त्यात आता वर्षा बंगल्याच्या भींतीचीही भर पडली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री पद गेल्यामुळे फडणवीस कुटुंबाला वर्षा बंगलाही सोडावा लागला. वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडताना केलेल्या दिरंगाई नंतर आता जेंव्हा हा बंगला नवीन मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी सूपूर्द करण्यात येत होता. त्यावेळी वर्षा बंगल्याच्या भींतीवर फडणवीस यांची लहान मुलगी ज्या खोलीत रहात होती त्या खोलीच्या भींतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहलं असल्याची माहीती आता समोर येत आहे. 

हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत...? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. शट अप, फडणवीस रॉक्स अशी वाक्य वर्षा बंगल्याच्या भींतीवर लिहीली असल्याची आढळून आली आहेत. या अशा प्रकारे भींतीवर लिहीलेल्या वाक्यांमुळे फडणवीस कुटुंब उद्धव ठाकरेंचा किती द्वेष करू लागलेत हेच दिसून येत आहे.

Web Title: Varsha bungalow has scribbles about Uddhav Thackeray

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com