नागरिकत्व कायद्यावरुन दिल्लीत हिंसक आंदोलन, सर्वत्र आंदोलनाचे पडसाद

नागरिकत्व कायद्यावरुन दिल्लीत हिंसक आंदोलन, सर्वत्र आंदोलनाचे पडसाद

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत झालेल्या जाळपोळीप्रकरणी पोलिसांनी जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. काही विद्यार्थ्यांना लाठीमार करत कॅम्पसच्या बाहेर ओढून आणण्यात आलं. हात वर केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पोलीस हॉस्टेल आणि ग्रंथालयातून बाहेर घेऊन येताना दिसले. पोलिसांनी विनापरवाना कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना बळजबरीने बाहेर काढले, असा आरोप विद्यापीठाचे चीफ प्रॉक्टर यांनी केला.  त्याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र प्रदर्शन सुरु असेपर्यंत या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रिम कार्टोनं नकार दिलाय. दरम्यान आज पुन्हा विद्यार्थ्यांकडून निदर्शनं सुरु आहेत. शिवाय या घटनेविरोधात देशभरीतील इतर विद्यापिठांमध्ये निदर्शनी केली जातायंत. तर कालच्या प्रकारानंतर भयभीत झालेले जामिया मिलियाचे विद्यार्थी आज वसतीगृह सोडून घराकडे रवाना होतांना पाहायला मिळाले.

मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. काही विद्यार्थ्यांना लाठीमार करत कॅम्पसच्या बाहेर ओढून आणण्यात आलं. हात वर केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पोलीस हॉस्टेल आणि ग्रंथालयातून बाहेर घेऊन येताना दिसले. पोलिसांनी विनापरवाना कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना बळजबरीने बाहेर काढले, असा आरोप विद्यापीठाचे चीफ प्रॉक्टर यांनी केला.  त्याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र प्रदर्शन सुरु असेपर्यंत या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रिम कार्टोनं नकार दिलाय. दरम्यान आज पुन्हा विद्यार्थ्यांकडून निदर्शनं सुरु आहेत. शिवाय या घटनेविरोधात देशभरीतील इतर विद्यापिठांमध्ये निदर्शनी केली जातायंत. तर कालच्या प्रकारानंतर भयभीत झालेले जामिया मिलियाचे विद्यार्थी आज वसतीगृह सोडून घराकडे रवाना होतांना पाहायला मिळाले.

वाहनांची जाळपोळ, पोलिसांचा गोळीबार

नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला  राजधानीतही हिंसक वळण लागलं. दिल्लीच्या जामिया मिलीया विद्यापीठ भागात आंदोलकांनी 4 बस आणि पोलिसांची 6 वाहनं जाळली. तो आगडोंब विझवताना अग्निशमन दलाचे 3 जवान आणि 6 पोलीस जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आणि दक्षिण दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये घबराट पसरली. 

गेल्या 24 तासात दुसऱ्यांदा नदवा कॅम्पसमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. प्रशासनाकडून खबरदारीचे उपाययोजना म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

आंदोलनाचे पडसाद लखनौमध्ये

नागरिकत्व कायद्यावरुन दिल्लीतल्या जामिया इस्लामिया कॅम्पस आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाचे पडसाद. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्येही पाहायला मिळतायत. नदवा कॉलेज कॅम्पसमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी कॉलेजचं गेट रोखून धरत,कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना या आंदोलकांनी निशाणा बनवलं. गेटजवळ गेलेल्या पोलिसांवर आंदोलक विद्यार्थ्यांनी आधी चप्पल आणि सामान फेकलं.

त्यानंतर दगडांचा वर्षाव पोलिसांवर झाला. या आक्रमक विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन वारंवार प्रशासानकडून करण्यात येतंय. मात्र नागरिकत्व कायद्यावरुन आक्रमक विद्यार्थी माघार घेण्यास तयार नाहीत.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शनं झाली. आणि त्यानंतर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये हिंसाचार उफाळून आला. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईविरोधात देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतायत. हैदराबादच्या मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यार्थ्यांनी लेक्चरला न बसता. आंदोलनात सहभाग नोंदवला.. बॅनर्स, पोस्टर्ससह हे विद्यार्थ्यी रस्त्यावर उतरले असून. न्यायाची मागणी करत संघाविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली.

लाठीचार्जचा मुंबईतही निषेध

जामिया मिलिया विद्यापिठातील लाठीचार्जचा मुंबईतही निषेध केला जातोय. देवनारमधील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलाय. चेंबूरच्या डॉ.बाबासाहेह आंबेडकर उद्यानापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आलाय. या निषेध मार्चात मोठ्या संख्येने टीसचे विद्यार्थी सहभागी झालेत. या विद्यार्थ्यांनी रविवारीही कँडल मार्च काढत जामिया मिलिया विद्यापिठातील घटनेचा निषेध केला होता.

Web Title -  Violent agitation at Muslim University in Delhi over citizenship law

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com