VIDEO | आघाडीच्या नव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा कसा?

VIDEO | आघाडीच्या नव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा कसा?
What are the Exact benifits of shivsena..

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा घरोबा शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. पण का ? भाजपला वगळून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करणाऱ्या शिवसेनेला नवी मैत्री फायदेशीर ठरणार असल्याचंच दिसतंय. कारण काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेत सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर त्यामुळेच नव्या मैत्रीचा शिवसेनेला फायदा होईल का? शिवसेनेला ५ वर्ष मुख्यमंत्रिपद मिळेल का? मुख्यमंत्रिपदासह १६ खातीही शिवसेनेच्या वाट्याला? जातील का? हे सर्व पेच कसे सुटतील तर यासंदर्भात जाणून घेऊया या सविस्तर पंचनाम्यातून... 

नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर, अन्य महत्त्वाच्या पदांचं वाटप समसमान होणार आहे.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदानंतर उरलेल्या खात्यांचं वाटप १६-१४-१२ असं होणार आहे. शिवसेनेला १६, राष्ट्रवादी काँग्रेसला १४ तर काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महत्त्वाच्या खात्यांपैकी गृहखातं राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदासह महसूल हे खातं काँग्रेसला मिळणार आहे. अर्थ आणि नगरविकास खातं शिवसेनेकडं राहणार आहे.
एकंदरीतच भाजपकडे अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करणं लॉटरी असल्याचं मानलं जातेय.

Web Title - What are the Exact benifits of shivsena..

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com