बीड जिल्हा परिषदेतही मुंडे भावंडांमध्ये भावाचाच विजय?

बीड जिल्हा परिषदेतही मुंडे भावंडांमध्ये भावाचाच विजय?

बीड : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आज होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या बहीण पंकजा मुंडे यांना धक्का देणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेत सध्या भाजपची सत्ता असली तरी संख्याबळाचा विचार करता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चमत्कार घडवण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा परिषदेत ५३ सदस्य अध्यक्षपदासाठी मतदान करणार आहेत. यात आज तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड दिसून येत आहे.

एकूण ६० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदे मध्ये अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर समर्थक पाच सदस्यांनी बंडखोरी करत थेट भाजपला मदत केली होती. त्यामुळे २८ सदस्य संख्या असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला १७ सदस्यसंख्या असणाऱ्या भाजपने मात दिली होती. धस आणि जयदत्त क्षीरसागर यांनी उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेत पंकजा मुंडे यांना मदत केल्याने भाजपने जिल्हा परिषदेत आपली सत्ता राखली होती.

 मात्र २०१९ मध्ये राज्यातील झालेले सत्ता परिवर्तन आणि परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेले मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा बहिणीला धक्का देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title - who win Beed zp Election? pankaja munde or dhananjay munde?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com