खूशखबर! दिवाळीच्या मुहूर्तावर लोकलमध्ये वायफाय सेवा

खूशखबर! दिवाळीच्या मुहूर्तावर लोकलमध्ये वायफाय सेवा


मुंबई : लोकलमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम प्रवाशांना सातत्याने भेडसावत असतो. अशातच आता लोकलप्रवाशआंना दिलासा देणारी बातमी समोर येतेय. लोकलमधील प्रवेशांना आता लवकरच लोकलमध्ये फुल इंटरनेट नेटवर्क मिळणार आहे. 

मुंबईतील मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर मोठं गिफ्ट मिळणार आहे. दिवाळीत मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये वाय सेवा सुरु केली जाणारे. यामुळे आता मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना नेटवर्कची चिंता करण्याची गरज लागणार नाही. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिवाळीपासून लोकलमध्येच वायफाय सेवा दिली जाईल. वायफायच्या मदतीने मुंबईकर प्रवाशांना प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाण्यांचा आनंद घेता येणारे. 

किती लोकलमध्ये सेवा मिळणार?
वायफायची सेवा प्रायोगिक तत्त्वावर मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये चालवली जाणार आहे. वायफाय लागीगनंतर प्रवाशांना प्री-लोडेड माहिती पाहता येईल. प्री लोडेड वायफायसाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाचे खासगी कंपनीसोबत 5 वर्षांचा करार केलाय. सुरुवातील प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणारी वायफायची सेवा नंतर मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गावर सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.  मध्य रेल्वेच्या जवळपास 165 लोकलमध्ये सध्या वायफायची सेवा दिली जाणार आहे. 

कुणाची चिंता मिटणार?
लोकलमध्ये प्रवास करताना, सध्या प्रत्येकजण मोबाईवरच असतो. मोबाईल नेटवर्कमुळे अनेकदा इंटरनेट कंजेक्शनचा फटका 
लोकांना बसतो. अनेकदा यू-ट्यूब, फेसबूक पाहताना, स्लो डाऊनलोडिंगचा सामना लोकांना करावा लागतो. अशात आता लोकलमधील
वायफाय सुविधेमुळे लोडिंशशिवाय लोकांना इंटरनेट एक्सेस करता येणारे. 

Web Title - Wifi in mumbai local 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com