यवतमाळ विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची तारिख ठरली!

यवतमाळ विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची तारिख ठरली!

यवतमाळ : भारत निवडणूक आयोगाने यवतमाळ विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा शुक्रवारी (ता. तीन) केली. 

महाराष्ट्रात यवतमाळ विधान परिषदेची एक जागा शिवसेनेचे स्थनिक विधान परिषद सदस्य तानाजी जयवंत सावंत यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली होती. ते विधानसभेत निवडून गेल्याने २४ ऑक्टोबर २०१९ पासून विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. त्यांचा कार्यकाळ ५ डिसेंम्बर २०२२ रोजी संपणार होता. परंतु, सदर जागा रिक्त झाल्यामुळे भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

त्यामुळे मंगळवार, ता. ७ जानेवारी २०२० पासून आचारसंहितासुद्धा लागू होणार असून उमेदवारी अर्ज भरणे सुरू होणार आहे. मंगळवार, ता. १४ जानेवारी २०२९ अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. बुधवार, ता. १५ जानेवारीला अर्जाची छाननी होईल. शुक्रवार, ता. १७ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. शुक्रवार, ता. ३१ जानेवारी २०२० ला निवडणूक घेण्यात येईल. 

सकाळी ८ ते दुपारी ४ ही निडणुकीची वेळ निर्धारित करण्यात आली आहे.मंगळवार, ता. ४ फेब्रुवारी २०२० रोजी मतमोजणी होईल. गुरुवार, ता. ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत निडणूक कार्यक्रम पूर्ण होईल. याबाबतची माहिती भारत निवडणूक आयोगाचे अंडर सेक्रेटरी पवन दिवाण यांनी दिली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com