ईव्हीएम घोटाळ्याच्या खोलात जाऊ - शरद पवार

ईव्हीएम घोटाळ्याच्या खोलात जाऊ - शरद पवार

लोकसभा निवडणूक यंत्रात घोटाळा झाल्याचा शरद पवारांनी पुन्हा धक्काॉदायक आरोप केलाय .  मतदार मतदान केंद्रामध्ये जाऊन जिथे मत देतात, त्या ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात EVM किंवा व्हीव्हीपॅट VVPAT यंत्रात कोणतीही गडबड नाही. पण निवडणूक अधिकाऱ्यांकडे असणाऱ्या मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी आणि दिल्लीत विरोधकांशी चर्चा करून आम्ही या विषयाच्या खोलात जाणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. शरद पवार एनसीपीच्या स्थापना दिनाच्या मेळाव्यात बोलत होते .


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जी मतदान प्रक्रिया राबविली जाते, त्यावर शंका उपस्थित केली. याआधीही शरद पवार यांनी ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असे म्हटले होते. 

शरद पवार म्हणाले, आपण ज्यांना मत देत आहोत, ते प्रत्यक्षात त्यांना जातच नसल्याचे लक्षात आल्यावर लोक सध्या शांत राहतील. पण भविष्यात ते नक्कीच कायदा हातात घेतील. आपण तसे होऊ दिले नाही पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

लोकशाही प्रक्रियेवर हल्ला 

बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी व्यक्तीला लोकसभेचे तिकीट देणे हा तर लोकशाहीवरील हल्ला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मालेगाव स्फोटात ज्या महिलेवर गंभीर आरोप आहेत. तिला लोकसभेच्या निवडणुकीचे तिकीट देणे हा तर लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रकार असल्याचे शरद पवार म्हणाले. 

भोपाळमधील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचे नाव न घेता शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली.

दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकच्या तयारीला लागे असे आदेशही शरद पवार यांनी दिले आहेत . 

webtital -MarathiNews-opposition will do in-depth investigation EVM scam says Sharad Pawar 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com