MPSC च्या जागांमध्ये होणार वाढ...

 MPSC च्या जागांमध्ये होणार वाढ...

पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या फेब्रुवारीमध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी डिसेंबर 2018 मध्ये काढलेल्या जाहिरातीत 342 पदसंख्या जाहीर केली होती. मात्र त्यानंतर सरकारच्या मागणीनुसार या पदसंख्येत वाढ करण्यात आली असून आता एकूण 17 संवर्गातील 431 पदसंख्येसाठी ही भरती होणार आहे.

आयोगामार्फत डिसेंबर 2018मध्ये निघालेल्या जाहिरातीनुसार एकूण 11 संवर्गातील 342 पदांसाठी राज्य सेवा पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये ही पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर मे महिन्याच्या सुरवातीला या पदसंख्येत 342 वरून 424 पर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा या पदसंख्येत आयोगाने वाढ केली असून आता ती 431 इतकी झाली आहे. यात भूमी अभिलेख उप अधीक्षक (गट - ब) संवर्गातील सात पदे समाविष्ट केले आहे. त्यासंदर्भातील घोषणापत्र आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य सेवा परीक्षेतून आता उप जिल्हाधिकारी पदासाठी 40 पदे, पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त 31, सहायक राज्यकर आयुक्त 12 , उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी 21, राज्य वित्त व लेखा सेवा सहायक संचालक 16, उद्योग उपसंचालक 6, तहसीलदार 77, उपशिक्षणाधिकारी 25, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 3, कक्ष अधिकारी 16, सहायक गट विकास अधिकारी 11, भूमी अभिलेख उप अधीक्षक 7, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक 10, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क 1, उद्योग अधिकारी 37, सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम 5 आणि नायब तहसीलदार पदासाठी 113 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे आयोगाने घोषणापत्रात म्हटले आहे.

 

Web Title: MPSC Exam Seats Increase State Government

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com