कोरोना बचावासाठी झाडाला बांधले मास्क

कोरोना बचावासाठी झाडाला बांधले मास्क
Saam

वसईत एका अजब गजब प्रकार पाहायला मिळाला आहे. वसईच्या सनसिटी परिसरात गास रोड असलेल्या काही झाडांना मोठ्या प्रमाणात मास्क बांधलेले आढळून आले आहेत. या संदर्भात विचारणा केली असता कोरना होऊ नये म्हणून श्रद्धेने हे मास्क बांधले जात असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. या झाडांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलेच  पसरत आहे.(Mask tied to a tree to defend the covid-19)

हे देखील पाहा 

वसई पश्चिम परिसरात असलेल्या सनसिटी परिसरात गास रोडवर दररोज सकाळ संध्याकाळ प्रभातफेरीसाठी शेकडो नागरिक जात असतात. या परिसरात पावसाचे पाणी जमून चागंले हिरवेगार वातावरण तयार होते. या रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. याठिकाणी काही झाडांवर नागरिक करोना काळात बचावासाठी असलेल्या मुखपट्ट्या बांधून झाडाचे दर्शन घेताना आढळून येतात. या संदर्भात येथे फिरणाऱ्या नागरिकांना विचारले असता त्यांनी या झाडाला मास्क बांधल्याने कोरोना होत नाही. कोरोनाचे संकट घरात येत नाही असे सांगितले. यामुळे अनेक नागरिक या झाडांना येवून आपले मास्क बांधत आहेत. नागरिकांची ही भावना आता कुतूहलाचा विषय ठरत आहे. कारण या झाडांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारात आहेत.

Edited By: Pravin Dhamale
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com