तौक्ते चक्रीवादळाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तांडव !

तौक्ते चक्रीवादळाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तांडव !
Sindhudurg

सिंधुदुर्ग : तौक्ते Tauktae चक्रीवादळामुळे Cyclone जिल्ह्यात District सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान  Damage To Houses झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. Massive Damage Due To Taukte  Cyclone In Sindhudurg District

हे देखील पहा -

या वादळाचा सर्वाधित फटका आतापर्यंत वैभववाडी Vaibhavwadi तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण 27 घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून 2 शाळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. एक विद्युतपोलही वैभववाडी तालुक्यात पडला आहे. 

इतर तालुक्यातील नुकसानीच्या प्राप्त आकडेवारीनुसार दोडामार्ग Dodamarg तालुक्यात 8 झाडे पडली आहेत. सावंतवाडी Sawantwadi तालुक्यात 6 ठिकाणी झाडे पडली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे. तर पाच झाडे पडली आहेत. कुडाळ Kudal तालुक्यात 2 घरांचे नुकसान झाले असून एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे. तर 4 ठिकाणी झाडे पडली आहेत. तसेच एका ठिकाणी विद्युत पोलही पडला आहे. Massive Damage Due To Taukte  Cyclone In Sindhudurg District

मालवण Malvan तालुक्यात 2 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका पत्र्याच्या शेडचे नुकसान व एक विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात 9 घरांचे, एका गोठ्याचे, एका शाळेचे नुकसान झाले आहे. तीन ठिकाणी झाडे पडली आहेत. देवगड तालुक्यात एका घराचे नुकसान झाले असून 2 ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com