माथेरानची मिनीट्रेन आजपासून सुरू

माथेरानची मिनीट्रेन आजपासून सुरू


मुंबई: गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेल्या माथेरानच्या मिनीट्रेनच्या सफारीचा आनंद आज, शुक्रवारपासून पर्यटकांना घेता येणार असून, अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कुटुंबीयांसह माथेरानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेरळ ते माथेरान असा पूर्ण टप्पा सुरू होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे मिनीट्रेनच्या रुळांचे नुकसान झाले होते. यामुळे ९ ऑगस्टपासून या गाडीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. दुरुस्तीचे काम पूर्ण करून मध्य रेल्वेने नाताळच्या मुहूर्तावर चाचणी घेतली. ती यशस्वी झाली असून, अमन लॉज ते माथेरान आणि पुन्हा परत अशा सेवा सुरू करण्यात येत आहेत. सकाळी ८.१५ ते सायंकाळी ८.५५ या वेळेत मिनीट्रेनच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. कार्यालयीन दिवशी ८ आणि शनिवार-रविवारी १० फेऱ्या चालवण्यात येतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

पर्यटक, विशेषत: बच्चे कंपनीसाठी मिनीट्रेन हे विशेष आर्कषण आहे. मिनीट्रेन पुन्हा सुरू होत असल्याने दुरावलेल्या प्रवाशांची पावले पुन्हा माथेरानकडे वळतील, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

- सन १९०७मध्ये सुरू झाली माथेरानची मिनीट्रेन.


- 'युनेस्को'कडून सन २००३मध्ये जागतिक वारसा यादीत समावेश.

- मे २०१६मध्ये सलग दोनवेळा रुळांवरून घसरल्यामुळे मिनीट्रेन दुरुस्तीसाठी बंद.

- या कामामुळे सुमारे २० महिन्यांसाठी मिनीट्रेन बंद ठेवण्यात आली होती.

अमन लॉज ते माथेरान माथेरान ते अमन लॉज

स. ८.४० ते स. ८.५८ स. ८.१५ ते स. ८.३३

स. ९.५५. ते स. १०.१३ स. ९.३० ते स. ९.४८

स. १०.४५ ते स. ११.०३ स. १०.२० ते स. १०.३८

स. ११.५५ ते दु. १२.१३ स. ११.२५ ते स. ११.४३

दु. १२.४५ ते दु. १.०३ दु. १२.२० ते दु. १२.३८

दु. २.०० ते दु. २.१८ दु. १.३५ ते दु. १.५३

दु. ३.०५ ते दु. ३.२३ दु. २.४० ते दु. २.५८

दु. ३.५५ ते दु. ४.१३ दु. ३.३० ते दु. ३.४८

*दु. ४.४५ ते दु. ५.०३ दु. ४.२० ते दु. ४.३८

*सायं. ५.३५ ते सायं. ५.५३ सायं. ५.१० ते सायं. ५.२८

Web Title:  matheran toy train service starts from today
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com