आषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...

आषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...
Wari

आळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय घेत कोरोना Corona पार्श्वभूमीवर याही वर्षी आषाढी पायी वारी निघणार नाही असा निर्णय Decision घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी हा निर्णय देखील जाहीर केला. Meeting in Alandi for the government to reconsider Ashadi Wari

त्यामुळे आळंदी Alandi व देहूतील Dehu ग्रामस्थ आणि राज्यातील वारकरी यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. निर्णय झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर वारकरी हे पायी वारी पालखी Palakhi सोहळा घेण्यावर ठाम आहेत.

मात्र आता याच मुद्द्यावर महाराष्ट्रात आता राजकारण Politics सुरु झाले आहे. विरोधी पक्षनेते व  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांना पत्र लिहीत या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे.

हे देखील पहा -

याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने पायी वारी पालखी सोहळ्यासंदर्भात पुनर्विचार करावा यासाठी आळंदीमध्ये आज अकरा वाजता आळंदीत बैठक Meeting आयोजित करण्यात आली असून, यामध्ये आषाढी वारी संदर्भात महत्वपूर्ण चर्चा पार पडणार आहे. 

या बैठकीसाठी संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिर व पालखी सोहळ्याचे सर्व विश्वस्त तसेच शितोळे सरकार, हैबत बाबा याचे वंशज तसेच राज्यभरातील प्रमुख विणेकरी-फडकरी, चोपदार यांचे प्रतिनिधी चर्चा करतील. 

बैठकीनंतर मानाच्या पालखी प्रमुखांशी दुपारी एक वाजता दहा देवस्थानांचे प्रमुख  प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे मांडणार भूमिका आहेत. आळंदी देवस्थानच्या पुढाकाराने ही बैठक पार पडणार आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com