आरोग्य विभागातील मेगाभरती तातडीने करणार - राजेश टोपे

आरोग्य विभागातील मेगाभरती तातडीने करणार - राजेश टोपे
rajesh tope

जालना - राज्यातील आरोग्य विभागातील Health Department रिक्त जागांसाठी तातडीने मेगाभरती Megabharti करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली आहे. २०१८ मध्ये आरोग्य heatlh विभागातील रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या मेरीट लिस्ट मध्ये जे परीक्षार्थीं वेटिंग लिस्टमध्ये होते. त्यांना आताच्या भरतीत पुन्हा परीक्षा Exam द्यावी लागणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.  Mega recruitment in health department will be done immediately

रुग्णवाहिका Ambulance रुग्णांकडून जास्तीचे दर आकारत असतील तर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी त्यासोबतच ऑक्सिजनचे टॅंकर आडवनाऱ्या राज्यांवर कारवाई करायला पाहिजे. ऑक्सिजन Oxygen दरांच्या चढउतारासाठी ऑक्सिजनचे टॅंकर दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे गुन्हा करण्यासारखे असल्याचे यावेळी टोपे म्हणाले.

हे देखील पहा -

राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्येचा दर कमी झाला असून काही भागात अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे राज्यभरात कडक लॉकडाऊन लावायचा की नाही हे 15 तारखेच्या दरम्यान ठरवले जाईल असं सांगत ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतच असेल तिथे कडक लॉकडाऊन लावावाच लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. Mega recruitment in health department will be done immediately

दरम्यान, दुसरीकडे लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. तिसऱ्या लाटे बाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता, राज्यात बाल रोग तज्ञ यांचा टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार संदर्भात सल्ला देण्यासाठी हा टास्क फोर्स काम करेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गुरुवारी रात्री यासंदर्भात काही बालरोग तज्ञ यांच्या सोबत संवाद साधला आहे. तर बालरोग तज्ञ यांचा टास्क फोर्स हा राज्यात तयार करण्यात येणार आहे. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com