राफेलला पडलं 'लिंबू' महागात!

राफेलला पडलं 'लिंबू' महागात!


  
राफेल बॉरडेव (फ्रान्स) : विजयदशमी व वायुसेनादलाच्या निमित्ताने काल (ता. 8) राफेल हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन हे लढाऊ विमान स्विकारले. भारतीय परंपरेनुसार त्यांनी विमानावर ओम चिन्ह रेखाटत श्रीफळ वाहिले. तसेच चाकाखाली लिंबू ठेवले होते. उदबत्ती ओवाळत राजनाथसिंह यांनी राफेलची पूजा केली. त्यानंतर या विमानातून संरक्षणमंत्र्यांनी उड्डाण केले. 

राफेलच्या या पूजेवरूनच कालपासून राजनाथसिंह ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर या पूजेने धुमाकूळ उडवला आहे. त्यात राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याचा फोटो व्हायरल झाल्यापासून या ट्रोलिंगला तर उधाण आले आहे. काल विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन करतात, त्यामुळे राफेलची पूजा करणे इतपत ठिक होते, पण लढाऊ विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवणे अति होते किंवा अंद्धश्रद्धेला प्रोत्साहन दिल्यासारखे होते असे नेटकऱ्यांचे म्हणणे पडले आहे. 

Web Title: memes gets viral on rafale pooja by RajnathSingh


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com