नांदेड मधील 128 कार्यालये बाॅम्बने उडवून देण्याची धमकी 

नांदेड मधील 128 कार्यालये बाॅम्बने उडवून देण्याची धमकी 
Bomb Threat to Nanded

नांदेड : दहा कोटी द्या आणि दरमहा सुरक्षा कर म्हणून पाच कोटी रुपये द्या अन्यथा नांदेड Nanded मधील जिल्हाधिकारी कार्यालयासह 128 शासकीय कार्यालये बाॅम्बने Bomb उडवून देण्याची धमकी एका माथेफिरू ने दिल्याने एकच खळबळ उडाली होती. Mentally Unstable Man Gave Bomb Threat to Nanded offices

नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालयाला ई मेल E-mail पाठवून ही धमकी देणाऱ्या माथेफिरूला स्थानिक गुन्हे शाखेने Crime Branch आज अटक केलीय... शेख अब्दुल शेख रफिक असं बाॅम्बने कार्यालयं उडवून देतो अशी धमकी देणाऱ्या माथेफिरुचे नाव आहे. 8 मे रोजी एका ई मेल द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेलवर हा धमकीचा मेल आला होता.

हे देखिल पहा

तेव्हा पासून अत्यंत गोपनीय पध्दतीने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती..नांदेड च्या एक किलोमीटर अंतरावरील जिल्हाधिकारी कार्यालयासह 128 शासकीय कार्यालय  ठरवून बाॅम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती.

यात हाॅटस्पाॅटची यादी ही ईमेल ला जोडण्यात आली होती. दहा कोटी आणि दरमहा पाच कोटी सुरक्षा कर देण्याची मागणी करणाऱ्या माथेफिरुची माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोध घेण्यात पोलिसांना यश आले. Mentally Unstable Man Gave Bomb Threat to Nanded offices

माथेफिरू हा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील शेख अब्दुल शेख रफिक असल्याचे उघडकीस आले.. स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत  शेख अब्दुल विरोधात वजिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..शेख अब्दुल याने नगर पालिकेची निवडणूक लढवली होती अशी माहिती समोर येत असून, धमकी देणारा माथेफिरू निघाल्यानं पोलिसांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला..

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com