Weather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट 

Weather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट 
Meteorological department expected heavy Rain in Mumbai and Konkan region

मुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पावसाचा Monsoon जोर आणखी वाढण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.  मुंबई  Mumbai आणि कोकण Kokan परिसरात येत्या चार ते पाच दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने Meteorological department दिला आहे. हवामान खात्याने या दोन्ही परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे. Meteorological department expected heavy Rain in Mumbai and Konkan region

मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी माहिती दिली आहे कि, बंगालच्या उपसागरात Bay of Bengal कमी दाबच्या पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर West coast त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये येत्या चार ते पाच दिवसांत जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत या जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. पावसाच्या सरी थोड्याथोड्या अंतराने पडत आहेत. तरी त्यांचा जोर जास्त आहे. यासोबतच विजांचा कडकडही ऐकू येत आहे. पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबईतील जनजीवन पाऊस सुरु राहिल्यामुळे पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि रायगडमधील Raigad पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने येत्या काही तासांत वर्तविली आहे. मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता या जिल्यांमध्ये आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रातही Maharashtra आहे. अंदाज वर्तवण्यात येत आहे कि, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल.  प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे, लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.


सिंधुदुर्गप्रशासन अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सज्ज-

हवामान खात्याने सिंधुदुर्गाला Sindhudurg अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग प्रशासन अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. या दोन दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालच पुण्यावरून NDRF टीम सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहेत. एक तुकडी सावंतवाडीमध्ये तैनात ठेवण्यात आली आहे. तर दुसरी मालवणमध्ये तैनात ठेवण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. 

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com