कोरोनातून बरे झाल्यावर मिलिंद सोमणने केला प्लाझ्मा दान करण्याचा निश्चय  

कोरोनातून बरे झाल्यावर मिलिंद सोमणने केला प्लाझ्मा दान करण्याचा निश्चय  
milind soman

मुंबई: आपल्या फिटनेस साठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण Milind Soman याची २५ मार्च २०२१ ला कोरोना Corona टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळेस त्याने तत्काळ स्वत:ला क्वारंटाईन केले होते. यानंतर हा अभिनेता ५ एप्रिल ला कोविड -१९ मधून बरा झाला. त्याची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्याचे त्याने आपल्या सोशल मीडिया वर त्याच्या फॅन्स ला सांगितले होते. कोविड मधून पूर्ण बरे झाल्यावर त्याने आता प्लास्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. Milind Soman appeals for plasma donation after his corona recovery  

कोरोनातून बरे झाल्यानंतर तो परत त्याच्या कसरतीच्या रुटीनमध्ये आला आहे. अलीकडे प्लाजमा देणगी बद्दल बोलत असताना त्याच्या 875 हजार फॅन्स ला तो  त्याच्या दिनचर्या Routine मध्ये तो काय करतो याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

मिलिंद सोमणने आपल्या इन्स्टाग्रामवर Instagram एक व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो भारतीय क्लबच्या जोडीबरोबर काम करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये, अभिनेता म्हणाला की, आपण प्लाझ्मा दान Plasma Donation करण्यासाठी पात्र होताच प्लाझ्मा दान करू असे सांगितले आणि लोकांना प्लाझ्मा दान करून जीव वाचवण्यासाठी आवाहन केले. त्यांनी लिहिलं आहे, "असं वाटतं की मी पूर्णपणे  बारा  झालो आहे आणि प्लाझ्मा दान करण्यास तयार आहे. कोविड १९  पासून बरे झालेल्या लोकांकडून  घेतलेले प्लाझ्मा जीव वाचविण्यात मदत करू शकते. शांत रहा. स्वतःची काळजी घ्या.  Milind Soman appeals for plasma donation after his corona recovery  

मिलिंद सोमणच्या या पोस्टला त्यांच्या चाहत्यांकडून आणि इतर लोकांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद Response मिळाला. काहींनी त्यांच्या पोस्टवर "खूप प्रेरणादायक" अशी देखील कमेंट केली आहे. असे असताना इतरांनीही त्याला मान्य केले. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, "हं! प्लाझ्मा दान केल्याने एखाद्याला नवीन आयुष्य मिळण्यास मदत होते"

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com