दोन प्रकारच्या लसी घेतल्या आणि अँटिबाॅडिज वाढल्या 'या' मंत्र्याने केला दावा

दोन प्रकारच्या लसी घेतल्या आणि अँटिबाॅडिज वाढल्या 'या' मंत्र्याने केला दावा
Sanjay Bansode

गोंदिया : दोन्ही कोरोनाच्या वेगवेगळ्या कंपनीच्या लसी घेतल्यामुळेच माझ्या शरीरात १०७ अँण्टीबाडीज तयार झाल्याचा अजब दावा राज्यमंत्री पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे  यांनी केला आहे. Sanjay Bansode Claims more Antibodies due to Two types of Vaccine 

बनसोडे यांनी जे. जे. रूग्णालयात J. J. Hospital कोरोनाची लस Vaccnie घेतली होती.  तेव्हा त्यांना पहिल्या डोसमध्ये कोविशिल्ड तर दुसऱ्या डोसमध्ये कोवँक्सीन देण्यात आले होते. त्यामुळे आपल्या शरीरात १०७ अँटिबाॅडीज तयार झाल्याचा दावा बनसोड यांनी केला आहे. 

यासंदर्भात आपण अमेरीकेतील America डाॅक्टरांशीसुद्धा बोललो असल्याचे, त्यांनी सांगितले आहे. तेव्हा आता नागरीकांनी पहिला कोरोना लसीचा डोस कोवीशिल्डचा घ्यायचा आणि दुसरा डोस कोवॅक्सीनचा घ्यायचा का, असा सवाल आता नागरिक खुद्द पर्यावरण राज्यमंत्र्यांना विचारू लागले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com