मावळातल्या वाझेंना जनतेने घरी बसवलं; सुनील शेळकेंचा टोला

मावळातल्या वाझेंना जनतेने घरी बसवलं; सुनील शेळकेंचा टोला
bala bhegade- sunil shalke.

आजी आमदार सुनील शेळके (Sunil shelke) आणि माझी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegde) यांच्या जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मावळातील वातावरण चांगलाच तापलं आहे. दोघेही एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करू लागले आहेत. मावळात सचिन वाझे सारखा वसुली एजंट ठेवलेत का? अशी टीका बाळा भेगडें यांनी विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यावर केली आहे. सुनील शेळके प्रतिउत्तर देताना म्हणाले मावळात सचिन वाझेंना दिड वर्षांपूर्वीच घरी बसवले आहे. (MLA Sunil Shelke has criticized Bala Bhegade)

प्रशासनावर कोणाचा अंकुश नसल्यामुळे अधिकारी बेभान सुटले आहेत. प्रत्येक खात्यात एजंटगीरी वाढली आहे. संगनमताने मोठ मोठ्या उलाढाली करत आहेत. शासकीय कार्यालयात लाच घेण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे लाचलुचत प्रतिबंधक विभागाने केलेल्या वर्षभरातील कारवाईमुळे सिध्द झाले आहे.  महाविकास आघाडीने मावळमध्ये देखील अधिकार्‍यांना वसुलीचे टार्गेट दिले आहे का? असा खोचक सवाल माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केला आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, राष्टवादीच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार सुनील शेळके यांनी मावळमध्ये रेकॉर्ड केला होता. बाळा भेगडे मागचे अनेक वर्ष मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर त्यांना भाजप-शिवसेनेच्या युती सरकारमध्ये मंत्री पद देखील देण्यात आले होते. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com