राज ठाकरे शरद पवार यांच्यात दोन तास दीर्घ चर्चा

राज ठाकरे शरद पवार यांच्यात  दोन तास दीर्घ चर्चा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट जवळपास दोन तासांची होती. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज हे पवार यांच्या भेटीला गेले असले तरी दोन तास कोणती चर्चा झाली हे कळले नाही. ईशान्य मुंबई लोकसभेची जागा मनसेला सोडण्याची विनंती राज यांनी पवार यांच्याकडे केल्याचे समजते.  मुलगा अमित यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज हे काल (शविारी) मातोश्रीवर गेले होते. त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लग्नाचे निमंत्रण त्यांना दिले होते. उद्धव यांच्या भेटीनंतर राज यांनी दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांची भेट घेतली. राज हे काल मातोश्रीवर अर्था ते पाऊण तास थांबले होते. आज पवारांच्या निवासस्थानी मात्र दोन तास होते. या दोन तासात राज यांनी मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबतही चर्चा केल्याचे समजते. 

राज यांच्या मनसेला ईशान्य मुंबई लोकसभेची जागा हवी आहे. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याकडे शब्द टाकल्याचेही कळते. वास्तविक येथून यापूर्वी संजय दिना पाटील हे निवडून आले होते. राष्ट्रवादीचे ते मुंबईतील एकमेव खासदार होते. त्यामुळे राष्ट्रवादी ही जागा मनसेला सोडेल का हा प्रश्‍न आहे. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमी राज हे कोणत्या आघाडीत असतील की स्वबळाचा नारा देतात याकडेही राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असली तरी ते कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत. ते मुलाच्या लग्नाचे निमंत्रण त्यांना देणार आहेत. राहुल गांधींबरोबरच भाजपतील कोणत्या नेत्यांना ते भेटणार याची उत्सुकताही राजकीय वर्तुळात आहे. 

येत्या 27 जानेवारी रोजी मुंबईतल्या सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेचा विवाह सोहळा पार पडणार आहे. 

Web Title: MNS chief Raj Thackeray meet NCP chief Sharad Pawar in Mumbai

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com