मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा दणका ! दिव्यांगांसाठी तोडला महापालिकेने लावलेला जॅमर

मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा दणका ! दिव्यांगांसाठी तोडला महापालिकेने लावलेला जॅमर
vasant more

पुणे : अनधिकृतपणे टेम्पो लावून व्यवसाय करण्याच्या विरोधात कारवाई करत पुणे महानगरपालिकेच्या Muncipal Corporation अतिक्रमण विभागाने लाल रंगाच्या छोटा हाथी टेम्पोला जॅमर Jammer बसवला होता.

हा टेम्पो दिव्यांग Disabled असणाऱ्या फळभाजी विक्रेत्याचा होता. परंतु गेल्या सहा दिवसांपासून जॅमर लावलेल्या या टेम्पोतील फळे व भाजीपाला टेम्पोत सडून या दिव्यांग बांधवांचे मोठे नुकसान झाले. 

आपल्या रोखठोक वृत्तीने ओळखले जाणारे मनसेचे MNS नगरसेवक Coporator वसंत मोरे Vasant More यांना याबाबत माहिती संबंधित दिव्यांग बांधवाने दिली. स्वतः सदर ठिकाणी येत वसंत मोरे यांनी हातोड्याने घाव घालून टेम्पोच्या चाकाला लावलेला जॅमर तोडून टाकला.या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियावर वायरल केला आहे. 

सदर दिव्यांग व्यक्ती टेम्पोच्या माध्यमातून फळविक्रीचा विकण्याचा व्यवसाय करत असतो. मात्र अनधिकृत पद्धतीने गाडी लावून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्याने पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या टेम्पोवर कारवाई करत टेम्पोला जॅमर बसवले. सहा दिवसांपासून टेम्पोला जॅमर होता त्यामुळे त्या दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय करण्यास अडचण निर्माण झाली व यात त्याचे बरेचसे नुकसान देखील झाले. 

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे नेहमी विविध कारणांनी चर्चेत असतात त्यांचा लोकांची कामे करण्याचा अंदाज काहीसा वेगळा आहे. प्रसंगी कायदा हातात घेत चटकन प्रश्न सोडवण्याचा त्यांचा कल असतो.

कोरोनाच्या Corona पहिल्या लाटेत कोरोनामुळे निधन झालेल्या त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने उद्विग्न झालेल्या मोरे यांनी नगरसेवकाच्या नातेवाईकाला जर सुविधा मिळू शकत नसेल तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल असा सवाल करत पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. सदर प्रकाराचा व्हिडिओ त्यांनी स्वतः शेअर केला होता. 

नगरसेवक वसंत मोरे सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर नेहमीच तत्परतेने मदत करत असतात. कोविड काळातील गरीब रुग्णांची खाजगी हॉस्पिटल मध्ये होणारी लाखोंची बिले माफ करण्यापासून ते स्वतः पुढाकार घेत रुग्णांना बेड मिळवून देण्यापर्यंत ते ताबडतोब कार्यतत्परता दाखवतात. मात्र कायदा हातात घेऊन काम करण्याच्या त्यांच्या या शैलीमुळे त्यांच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. 

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com