मोदींनी गुजरातला 1000 कोटी दिले, आता महाराष्ट्राला देखील......

मोदींनी गुजरातला 1000 कोटी दिले, आता महाराष्ट्राला देखील......
sanjay raut on modi

मुंबई: तौक्ते चक्रीवादळामुळे Tauktae Cylone झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी  Narendra Modi यांनी गुजरातला Gujrat 1000 कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र Maharashtra आणि गोव्यातही Goa या चक्रीवादळामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला 1500 कोटींची मदत पंतप्रधान मोदी यांनी दिली पाहिजे, असे वक्तव्य शिवसेनाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केले. Modi gave 1000 crores to Gujarat now to Maharashtra too 

गुरुवारी त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना असे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे अतिशय दिलदार असल्याचे संबोधले आहे. पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण देशात काय चालले याकडे लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी 1500 कोटींची मदत करू शकतील. असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.

हे देखील पहा -

पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत जाहीर केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा मी व्यक्त करतो. पण महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे 1500 कोटींची मदत केली पाहिजे.  अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. Modi gave 1000 crores to Gujarat now to Maharashtra too 

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही Uddhav Thackrey हे देखील, शुक्रवारी कोकणाचा दौरा केल्यानंतर केंद्र सरकारकडे काही मदतीची मागणी करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com