नेता म्हणून मोदी मला खूप आवडतात -ट्रम्प

नेता म्हणून मोदी मला खूप आवडतात -ट्रम्प

न्यूयॉर्क: मोदींसोबत मनमोकळेपणाने चर्चा करण्यात आली. आम्ही दोघे मिळून इस्लामिक दहशतवादाविरोधात लढा देणार आहोत, असं सांगतानाच भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतूनच त्यांचे अंतर्गत वाद सोडवू शकतात, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. मोदी दहशतवादाचा मुद्दा सोडवतील असं सांगतानाच मोदींनी दहशतवादा विरोधात पाकिस्तानला मोठ्याने संदेश दिला आहे. पाकिस्तान मोदींचा हा संदेश जरूर ऐकेल अशी अपेक्षा आहे, असं ट्रम्प म्हणाले. भारतासोबत लवकरच उद्योग करार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी मोदींचा मुक्तकंठाने गौरव करतानाच त्यांना भारताचे राष्ट्रपिताही संबोधले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान रॉकस्टार एल्विस प्रेस्लेंसारखे लोकप्रिय आहेत. नेता म्हणून मोदी मला खूप आवडतात. ते भारताच्या राष्ट्रपित्यासारखेच महान नेते आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली.


यावेळी मोदींनीही ट्रम्प यांची स्तुती केली. ट्रम्प हे केवळ माझेच मित्र नाही, तर संपूर्ण भारताचेही मित्र आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यानची मैत्री आता आणखी घट्ट होईल, असं सांगतानाच अमेरिकेसोबत ६० अब्जाचा करार करण्यात येणार आहे. दोन्ही देश वेगाने प्रगती करत आहेत, असं मोदी म्हणाले.
 

Web Title modi great leader like father of india donald trump

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com