अंबरनाथच्या कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर दान !

ventilator dan
ventilator dan

अंबरनाथ - देणाऱ्याने देत जावे .. या उक्तीप्रमाणे अंबरनाथ Ambernath नगरपालिकेने कोविड रुग्णालयासाठी Covid Hospital व्हेंटिलेटर ventilator व वैद्यकीय उपकरणांच्या मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन अंबरनाथकर असलेल्या मोहन कुलकर्णी Mohan Kulkarni या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पेंशन Pension रकमेतून एक व्हेंटिलेटर दान donate दिले असून त्यांच्या या योगदानाचे सर्वत्र कौतून होत असून इतरांनाही यामुळे मदतीची प्रेरणा मिळाली आहे.  Mohan Kulkarni donate  ventilator to covid Hospital in Ambernath

मोहन कुलकर्णी सन २०१२ मध्ये अंबरनाथमध्ये असलेल्या बोरेक्स मोरारजी कंपनी मधून सेवानिवृत्त झाले,काही दिवसांपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेने कोविड रुग्णालयासाठी मदतीचे आवाहन केले होते,या आवाहनाला प्रतिसाद देऊन कुलकर्णी यांनी आपल्या पेंशन रकमेतून एक व्हेंटिलेटर आज नगरपालिकेला मदत म्हणून दिले आहे. एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचे हे व्हेंटिलेटर असून त्यांच्या या योगदानाचे सर्वत्र कौतून करण्यात येत आहे.  इतरांनाही यामुळे मदतीची प्रेरणा मिळावी असे मत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ Prashant Rasal यांनी व्यक्त केले.

कुलकर्णी यांच्या पत्नीचा कॅन्सर या आजाराने मृत्यू झाला असून तिच्या नावे आपण गरजवंतांना मदत केली पाहिजे ,या हेतूने ज्यावेळी अंबरनाथ नगरपालिकेने कोविड रुग्णालयासाठी मदतीचे आवाहन केली तेव्हा आपण सुद्धा या कोविड मदतीसाठी काही तरी खारीचा वाटा उचलावा या भावनेने ही मदत केल्याचं कुलकर्णी म्हणतात.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com