100 रुपये घ्या आणि दाढी करा; बारामतीच्या चहावाल्याची पंतप्रधानांना मनीऑर्डर
money order

100 रुपये घ्या आणि दाढी करा; बारामतीच्या चहावाल्याची पंतप्रधानांना मनीऑर्डर

बारामती - लॉकडाऊनमुळे Lockdown हातावर पोट असलेल्यांचे कमालीचे हाल झाले आहेत. खर्च सुरु पण उत्पन्न बंद या मुळे अनेकांना कमालीचा मनस्ताप झाला आहे. ही व्यथा थेट देशाच्या पंतप्रधानांकडे मांडण्याचे काम बारामतीतील Baramati एका चहा tea seller विक्रेत्याने केले आहे. Money order to the Prime Minister form Baramati tea seller

सामान्यांची ही व्यथा समजून पंतप्रधान काही तरी मदतीचा हात पुढे करतील या आशाने बारामतीतील अनिल मोरे या चहाविक्रेत्याने थेट नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नावाने शंभर रुपयांची मनीऑर्डर Money Order केली आहे. मनी ऑर्डरसोबतच एका पत्राद्वारे त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. 

शहरातील एका रुग्णालयासमोर अनिल मोरे यांचा चहाचा गाडा आहे. लॉकडाऊनच्या या काळात घर चालविण्याची जवाबदारी त्यांच्यापुढे होती. त्यामुळे त्यांनी वैतागून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांना केलेली १०० रुपयांची मनीऑर्डर ही दाढी करण्यासाठी पाठवलेली आहे. अनोख्या पध्दतीने त्यांनी सामान्यांच्या व्यथेकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न केला आहे.  Money order to the Prime Minister form Baramati tea seller

पंतप्रधान हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. पण एकीकडे त्यांची दाढी वाढते आहे तर दुसरीकडे समस्या देखील वाढत आहेत. कोरोनामुळे ज्या कुटुंबियांनी आपला सदस्य गमावला आहे त्यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत करा.

हे देखील पहा -

तसेच पुढील काळात लॉकडाऊन जाहीर केल्यास कुटुंबाला किमान ३० हजारांची मदत करण्याची मागणी अनिल मोरे यांनी केली आहे. कोरोना अनेक लोकांचे कमालीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा अशी त्यांची मागणी आहे. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com