यंदा राज्यात नियोजित वेळापत्रकाच्या आधीच मान्सूनचे आगमन

यंदा राज्यात नियोजित वेळापत्रकाच्या आधीच मान्सूनचे आगमन
monsoon.jpg

महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर राज्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शेती कामाला वेग येणार. तर दुसरीकडे पावसाळा येत असल्याने संसर्ग वाढू नये यासाठी तयारी सुरु झाली आहे. Monsoon arrives in Maharashtra

बहुप्रतिक्षित मान्सून अखेर गोव्यासह महाराष्ट्रात दाखल झाला आहे. नेहमीपेक्षा एक दिवस अगोदरच केरळात दाखल होईल असा अंदाज असताना 3 दिवस उशिरा आलेला मान्सून गोव्यात मात्र अगोदरच आला आहे. मान्सूनसाठी आवश्यक असणारी पोषकस्थिती निर्माण नसल्याने झाल्याने अंदाज चुकवत मान्सूनने गोव्यासह महाराष्ट्रात प्रवेश केला आहे अशी माहिती गोव्याच्या हवामान खात्याने दिली असून येत्या 24 तासात ही मान्सूनच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याचा आहे.  

अरबी समुद्रात तौक्ते आणि बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ झालेले असतानाच मान्सूनवर याचा परिणाम होईल असा अंदाज हवामान खात्याचा होता. तरीही मान्सून 3 जूनला केरळ मध्ये दाखल झाला आणि आता मान्सून ऍडव्हान्स होत आता रत्नागिरीजवळच्या हर्णे पर्यंत पोहोचला आहे. येत्या 24 तासात मान्सून महाराष्ट्र कव्हर करेल असा अंदाज गोवा हवामान खात्याचा आहे. मान्सून दाखल झाल्या असतानाच गोव्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी बरसत आहेत. Monsoon arrives in Maharashtra

हे देखील पहा -

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. आज देखील संध्याकाळी अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यानं हैरान झालेल्या कोल्हापुरांना दिलासा मिळाला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेरणीची कामं अंतिम टप्प्यात आहे. 25 मे पासून शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली आहे. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com