मान्सूनचे मुंबईत आगमन; पहिल्याच दिवशी मुंबईत पाणी तुंबले

 मान्सूनचे  मुंबईत आगमन; पहिल्याच दिवशी मुंबईत पाणी तुंबले

वृत्तसंस्था : राज्यात मान्सूनला सुरुवातच झाली असताना मुंबईमध्ये रस्त्यांवर गुढघाभर पाणी साचले आहे. गेल्या काही वर्षांपासून हे चित्र समोर येत आहे. आजच मुंबईत मान्सून दाखल झाला असून पहिल्याच दिवशी मान्सूनने मुंबईला चांगलेच  झोडपले आहे.  मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईतील सायन परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. (Monsoon arrives in Mumbai; On the first day, Mumbai was flooded) 

चिंताजनक बाब म्हणजेच आजच (9 जून)  मुंबईत भरतीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह समुद्रात भरती वाढण्याचा अंदाजही आहे.मुंबईत सकाळी 11.45 पर्यंत मोठ्या भरतीची  शक्यता आहे. यावेळी समुद्राच्या लाटा 4.16 मीटर उंचीवर पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनारचा भाग रिकामा करण्यात आला आहे. तसेच, अनेक बचाव पथकेही या भागात  लक्ष ठेवून आहेत.

तथापि, आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक डॉ जयंत सरकार यांनी याबाबत माहिती दिली आहे.  यावर्षी मुंबईत मान्सूनच्या आगमनाची तारीख 10 जून होती पण यावेळी मान्सून वेळेच्या एक दिवस अगोदर दाखल झाला आहे. यापूर्वी मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत पाणी साचले आहे.  मुंबईतील हिंदमाता येथील रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. अनेक भागात रस्ते पाण्यात बुडून गेल्यामुळे  या ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली आहे.  मुंबईची लाईफलाईन असलेल्या  रेल्वेरुळावरही पाणी साचले आहे.  त्यामुळे लोकल ट्रेन सेवेवरही परिणाम झाला आहे.

एमएमआरडीएने पाऊस व त्यापासून होणाऱ्या समस्यांसाठी 24 तासांचा आपातकालीन मॉन्सून कंट्रोल रूम सुरू केला आहे. एमएमआरडीएने (मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) मुंबईत 24 तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. त्याअंतर्गत अडचणीत कोणतीही व्यक्ती मोबाइल क्रमांकावर 8657402090 आणि लँडलाईन क्रमांकावर 02226594176 वर कॉल करून मदतीसाठी अपील करू शकते.

Edited By- Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com