भंडाऱ्यात रास्ता रोखो आंदोलन करणाऱ्या खासदार व माजी आमदाराला अटक....

भंडाऱ्यात रास्ता रोखो आंदोलन करणाऱ्या खासदार व माजी आमदाराला अटक....
bhandara andolan news

भंडारा  - शेतकऱ्यांच्या Farmer विविध मागण्यांना घेऊन रास्ता रोखो आंदोलन Rasta Roko Andolan करणाऱ्या खासदार सुनील मेंढे Sunil Mendhe व माजी आमदार चरण वाघमारे Charan Waghmare यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना तुमसर पोलिसांनी Tumsar Police अटक केली आहे. लॉकडाऊन Lockdown सुरु असल्याने  धान उत्पादक शेतकऱ्यांचे विषय घेऊन रस्ता रोखो आंदोलन केल्या मुळे खासदारासह माजी आमदाराला अटक करण्यात आली आहे. ह्या आंदोलनाने मात्र काही तास चक्का जाम झाला होता. MP and former MLA arrested for blocking road in Bhandara

भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धान कापून तयार असून सरकार कडून धान खरेदी करण्या बाबत घोषणा झाल्या परंतु अद्याप जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आला नाही.

हे देखील पहा -

त्यामुळे तुमसर- मोहाडी तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे,खरीप हँगामाचे बोनस त्वरित शेतकऱ्यांच्या खात्याचे द्यावे,1 मे ते 30 जून पर्यंत ऑनलाइन करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे धान खरेदी करने बंधनकारक नाही ही अट शिथिल करण्यात यावी, गोदाम कमी पडल्यास तुमसर बाजार समितित धान खरेदी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. MP and former MLA arrested for blocking road in Bhandara

मात्र प्रशासनाद्वारे तोड़गा न निघाल्याने अखेर आंदोलन कारी रस्त्यावर आल्याने पोलिसांकडून भाजप खासदार सुनील मेंढे व माजी भाजपा आमदार चरण वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी एकच तनाव निर्माण झाला असून ह्या आंदोलनाने मात्र काही तास चक्का जाम झाला होता.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com