११ एप्रिल रोजी होणारी एमपीएसचीची परिक्षा पुढे ढकलली

११ एप्रिल रोजी होणारी एमपीएसचीची परिक्षा पुढे ढकलली
MPSC Exams Postponed.

मुंबई: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या रविवारी (ता. ११ एप्रील) होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही परिक्षा पुन्हा केव्हा होणार, हे मात्र सांगण्यात आलेले नाही. 

या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय घेण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

येत्या ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) गट-ब ची परीक्षा होणार होती.  मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj thakrey) यांनी राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thakrey यांना फोन केला होता. 

गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यातील Pune विद्यार्थ्यांनी रस्त्यांवर उतरून जोरदार आंदोलन केले होते. पण विशेष म्हणजे आता विद्यार्थ्यांनी याबाबाबत आपली भूमिका बदललेली आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेक  विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. यापैकी एका विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला आहे. परिक्षेच्या कारणामुळे सर्व विद्यार्थी एकत्र आले तर कोरोना पसरण्याचे प्रमाण अधिक वाढू शकते. पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com