200 पदांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’ राज्य सेवा पूर्व परीक्षा 

200 पदांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’ राज्य सेवा पूर्व परीक्षा 

पुणे - राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 200 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार आहे. या पदांसाठी मंगळवारपासून (दि.24) ते 13 जानेवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

सहाय्यक राज्यकर आयुक्त १० जागा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी ७, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी १, उद्योग उपसंचालक, तांत्रिक १, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता २ अशा वर्ग एकमधील २१ जागांची भरती केली जाणार आहेत. वर्ग ब मधील उपशिक्षणाधिकारी २५, कक्ष अधिकारी २५, सहायक गट विकास अधिकारी १२, सहायक निबंधक सहकारी संस्था १९, उप अधीक्षक भूमी अभिलेख ६, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ३, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग १, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ४, सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी तत्सम ११ आणि नायब तहसीलदार ७३  अशा जागांची पदांची भरती केली जाईल. 

पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी 2 ते 4 ऑगस्ट 2020 रोजी होण्याची शक्‍यता आहे. एकूण 200 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा दोन. तीन. व चार ऑगस्ट २०२० रोजी होण्याची शक्‍यता आहे. पूर्व परीक्षेसाठी अमागास वर्गासाठी ५२४ रुपये तर मागासवर्गीय व अथान उमेदवारांसाठी ३२४ रुपये शुल्क आहे. ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in आणि www.mpsc.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

पाच एप्रिल रोजी राज्यातील ३७ केंद्रावर पूर्वपरीक्षा होणार आहे. यासाठी २३ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत, असे एमपीएससीतर्फे कळविण्यात आले. यामध्ये सर्वाधिक नायब तहसीलदाराच्या ७३ जागांची भरती केली जाणार आहे.


Web Title: MPSC pre-test on 5th April
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com