पीएसआय पदभरतीसाठी एमपीएससी'चा मोठा निर्णय  

पीएसआय पदभरतीसाठी एमपीएससी'चा मोठा निर्णय  
mpsc.jpg

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (mpsc)ने पोलिस उपनिरीक्षक (psi)भरतीसंदर्भात  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  यापुढे पीएसआय पदाची मुलखात देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण अनिवार्य असणार आहे.  म्हणजेच उमेदवाराच्या क्वालिफिकेशनसाठी आता  मैदानी गुणही  ग्राह्य  धरले जाणार आहेत.   त्यामुळे आता पीएसआय भरतीमध्ये  पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षेतिल गुणांसह  शारीरिक चाचणीत  60 गुण असतील तरचं उमेदवार पुढील मुलाखतीस पात्र ठरणार आहे.  असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. लोकसेवा आयोगाने एका निवेदानातून ही माहिती प्रसिद्ध केली आहे.  (MPSC's big decision for PSI recruitment) 

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये निघालेल्या जाहिरातीपासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत. यानुसार,  मैदानी परीक्षेत 60 गुण आवश्यक करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.  शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरच उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे. म्हणजेच  पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मैदानी गुण क्वालिफिकेशनसाठी गृहीत धरले जाणार असल्याचे आयोगाने निवेदनात म्हटले आहे.  याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी ग्राह्य धरले  जात होते. मात्र आता ते शारीरिक चाचणीचे गुण अंतिम गुणवत्ता यादीतून वगळण्यात आले आहेत. आता इथून पुढे ते फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, अशी माहिती आयोगाने दिली आहे. 

पीएसआय पद भरतीसाठी शारीरिक मानकांमध्ये  पुरुषांसाठी गोळफेक मध्ये 15 गुण, पूलअप्स मध्ये 20 गुण, लांब उडी मध्ये 15 गुण तर धावण्यात 50 गुण अशी सुधारित मानके तयार करण्यात आली आहेत. तर महिलांसाठी गोळफेक मध्ये 20 गुण, धावण्यात 50 गुण आणि लांब उडीसाठी 30 गुण अशी मानके तयार करण्यात आली आहेत. या शारीरिक चाचणीमध्ये 60 गुण मिळाले तरच उमेदवार पुढील मुलाखतीसाठी पात्र ठरेल, असे निवडणात नमूद करण्यात आले आहे.  
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com