गोंदियात एकच खळबळ; आधी कोरोना, आता म्युकर मायकोसिस वाढतो कि काय ?

गोंदियात एकच खळबळ; आधी कोरोना, आता म्युकर मायकोसिस वाढतो कि काय ?
mucormycosis

गोंदिया : देशावर कोरोना Corona  महामारीचे संकट गडद झाले असतानाच, आता ब्लॅक फंगस (म्युकर मायकोसिस) Mucor mycosis या आजाराने डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे, विदर्भात Vidarbh या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यात गोंदिया जिल्ह्यातही ब्लॅक फंगसचा आजार झालेल्या एका रुग्णांची नोंद करण्यात आली असून  20 संशयित रूग्ण आधळले आहेत. Mucor mycosis patient found in Gondia district

अनेक रूग्णांवर नागपूर Nagpur येथील रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहीती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह District Administration नागरिकांच्या टेंशनमध्ये वाढ झाली आहे. म्युकर मायकासिसचा शिरकाव गोंदियात Gondia झाल्याने एकच खळबळ माजली आहे. 

हे देखील पहा -

मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णात घट होत असतानाच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी आहे. असे असले तरी ब्लॅक फंगस या आजाराचे नवीन आव्हाहन जिल्ह्याच्या समोर उभे ताकत असल्याचेही चित्र आता दिसू लागले आहे. Mucor mycosis patient found in Gondia district

विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात ब्लॅक फंगस या आजाराने ग्रस्त रुग्णाची नोंद करण्यात आली असून वीसहून अधिक संशयीत रूग्ण असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com