थिरकणं बंद! कोरोनामुळे मुंबईतील डिस्को आणि पब बंद ठेवण्याचे आदेश
pub bar corona

थिरकणं बंद! कोरोनामुळे मुंबईतील डिस्को आणि पब बंद ठेवण्याचे आदेश

मुंबई - मुंबईत कोरोनामुळे रोज नवनवे खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. अशातच आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पब आणि डिस्को बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जमावबंदीनंतर पब आणि डिस्को बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. तसे निर्देशही आता पब आणि डिस्को चालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पब आणि डीस्कोमधील डीजेवाले बाबूंचं गाणं काही काळ का होईना, शांत होणार आहे.

मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांना आकडा वाढलाय. आज 4 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून त्यातील मुंबईतील 3 रुग्ण आढळलेत. आता मुंबईतील रुग्णांचा आकडा 8वर गेला आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते आहे. देशातील सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकच घबराट पसरली आहे. लोकल ट्रेन, बसमध्येही लोकांकडून खबददारी बाळगण्यात येते आहे. 

मुंबईतील जमावबंदीनंतर आता सरकारने घेतलेला हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळे गर्दीला तर आळा बसेलच. मात्र डिस्को आणि पब चालकांचं आर्थिक नुुकसान होण्याची भीती वर्तवली जाते आहे. कोरोनामुळे आधीच सर्व क्षेत्रांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका बसलाय. अशातच आता पब आणि डिस्को चालकांचंही धाबं दणाणण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, उद्या (17 मार्च) मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी अधिक कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

कोरोना हा गर्दीमुळे जास्त वेगाने पसरतो. लोकं सध्य मास्क आणि रुमालाचा वापर करत असले तरीही खबरदारी घेण्यासाठी आता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचंय. 

पाहा व्हिडीओ - 

mumbai corona virus disco pub shutdown marathi government mahaaghadi shivsena congress maharashtra ncp uddhav thackrey covid-19

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com