“तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात.. 
Mumbai Mayor Kishori Pednekar Controversial Tweet

“तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात.. 

मुंबई : मुंबईच्या Mumbai महापौर Mayor किशोरी पेडणेकर सध्या वादात अडकले आहेत. ट्विटरवर Twitter प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याचा बाप काढणं किशोरी पेडणेकरानां महागात पडलं आहे. नेटकऱ्याने लसीकरण संदर्भात पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडर संबंधीत प्रश्न विचारले असता. किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दात उत्तर दिले आहे. यानंतर सोशल मीडियावर किशोरी पेडणेकर ट्रोल होऊ लागल्या. अखेर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे. Mumbai Mayor Kishori Pednekar Controversial Tweet 

या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारल होत. किशोरी पेडणेकर Kishori Pednekar यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असे म्हणाले आहे. हे ट्विट व्हायरल Viral झाल्याने महापौरांवर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर social media ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं आहे.

किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता. Mumbai Mayor Kishori Pednekar Controversial Tweet

हे देखील पहा

महापौरांच्या या आक्षेपार्ह भाषेवर विरोधकांनीही विरोध केला आहे. “मुंबईच्या पहिल्या नागरिक असल्याने लोकांना त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी सुसंस्कृत भाषेची अपेक्षा आहे,” असं भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी देखील महापौरांनी आपल्या कार्यालयाचा मान राखला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com