मुंबई बार्ज दुर्घटनाप्रकरणात कॅप्टन विरोधात गुन्हा

मुंबई बार्ज दुर्घटनाप्रकरणात कॅप्टन विरोधात गुन्हा
Mumbai Barge Tragedy

मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या दरम्यान अरबी समुद्रात बार्ज पी-३०५ बुडाल्या प्रकरणी बार्जचे कॅप्टन राकेश बल्लव यांच्या विरोधात यलोगेट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बार्जवरील कर्मचारी मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी हा  हा गुन्हा नोंदवला आहे. Mumbai Police Filed case against Captain of P 305 Barge

चक्रीवादळाचा सूचना असताना कँप्टन राकेश बल्लव याने बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घालून काही जखमी, दुखापत झालेल्या व बुडालेल्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे देखिल पहा

आॅईल अँड नॅचरल गॅस काॅर्पोरेशनच्या एका प्रकल्पावर अॅफकाॅन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा हा बार्ज काम करत होता. त्यावर २६१ लोक होते. हा बार्ज १७ मे रोजी तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडला आणि बुडाला. त्यावेळी हा बार्ज मुंबई पासून ३५ सागरी मैल अंतरावर होता. Mumbai Police Filed case against Captain of P 305 Barge

चक्रीवादळाचा इशारा मिळूनही हा बार्ज किनाऱ्याकडे आणण्यात आला नाही. त्यानंतर चक्रीवादळाचा तडाखा बसल्यावर बार्जमध्ये पाणी घुसू लागले. सोमवारी हा बार्ज बुडू लागला. त्यानंतर नौदलाच्या नौकेने शर्थीचे प्रयत्न करुन १८८ जणांना वाचवले. पण काही जण बेपत्ता असून आतापर्यंत ४९ मृतदेह काढण्यात आले आहेत. 

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com