गळा आवळून सुनेने केला सासूचा खून

गळा आवळून सुनेने केला सासूचा खून
Saam Banner Template (46).jpg

लातूर - आई समान असलेल्या सासूलाचा mother in law गळा आवळून ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी सून व नातवाला लातूर Latur जिल्ह्यातील निलंगा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. murder case of mother in law from latur

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथील 75 वर्षीय रूक्मिणबाई राजाराम माने या महिलेचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला असता सून ललिता शिवाजी माने व नातू गणेश शिवाजी माने यानी घरामध्ये कोणी नसल्याचे बघून घरात असलेल्या सासूला दोघांनी गळा आवळून जागीच ठार केले आणि घटनास्थळावरून पळून गेले.

आरोपी महिलेचा पती व सासू पासून अनेक वर्षापासून दोघे वेगळे राहत होते. तसेच पतीला व सासूला मारहाण करणे आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने यापूर्वी हल्ले केले असल्याचे समजते. आई समान असलेल्या सासूला ठार मारून जीव घेतल्याने माणूसकीला काळींबा फासेल अशी घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  murder case of mother in law from latur

हे देखील पहा -

सदरील आरोपी महिलेचा पती हा पाटबंधारे विभागात शासकीय सेवेत आहे. पतीला अनेकदा वाद करून त्यांना पण मारहाण केली आहे. याबाबत कोर्टातुन पतीच्या पगारातून पोटगी घेत आहे. तसेच पतीला सुध्दा जीवघेणे हल्ले सदरील आरोपी महिलेने केले आहेत. असे संबंधित महिलेच्या पतीने सांगितले आहे. याबाबत माझ्या आईचा खून माझ्या पत्नीने व मुलाने केला आहे असा आरोप पती शिवाजी माने यांनी केला आहे. निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामा केला आहे. पुढील तपास निलंगा पोलिस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com