अकोल्यात जमिनीच्या वादातून एकाची हत्या; एक गंभीर जखमी

अकोल्यात जमिनीच्या वादातून एकाची हत्या; एक गंभीर जखमी
akola

अकोला : जिल्ह्यातल्या तेल्हारा Telhara पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भांबेरी या गावात जमिनीच्या Land वादातून Dispute वडील आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली यात वडिलांचा  जागीच मृत्यू Death झाला असून गंभीर अवस्थेत मुलाला अकोला येथे हलवण्यात आले आहे. Murder Of One In A Land Dispute In Akola; One Seriously Injured

सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार भांबेरी येथील देविदास भोजने आपल्या परिवारासोबत राहत होते. गावातीलच राहणाऱ्या भोजने परिवाचा जमिनीचा वाद बऱ्याच वर्षापासून सुरू होता.

आज हा वाद विकोपाला गेल्याने अंदाजे ७० वर्षीय देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडे पाईपणे जबरदस्त प्रहार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देवीदास भोजने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. Murder Of One In A Land Dispute In Akola; One Seriously Injured

तर देविदास भोजने यांचा मुलगा तीस वर्षीय मुलगा अजय भोजने याला देखील जबर मारहाण करण्यात आली आहे.गंभीर अवस्थेत पडलेल्या अजय भोजने याला तात्काळ उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणले असता स्थानिक डॉक्टरांनी अकोला रुग्णालय येथे हलवण्याचे सांगितले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस Police स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेत एका संशयित आरोपीला अटक केली असून नेमकी ही हत्या Murder कोणी व का केली याचा तपास सुरू आहे. आज घडलेल्या या हत्याकांडाने तेल्हारा परिसर हादरून आहे.

Edited By : Krushnarav Sathe  

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com