बीडच्या नागापूर खुर्द गावात थरार.... कुऱ्हाडीने वार करत दोन भावंडांचा खून!

बीडच्या नागापूर खुर्द गावात थरार.... कुऱ्हाडीने वार करत दोन भावंडांचा खून!
murder

बीड  - क्षुल्लक कारणावरून 15 दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे, 2 भावंडाची कुऱ्हाडीने Ax सपासप वार करून भर रस्त्यात हत्या Murder करण्यात आली आहे.ही धक्कादायक घटना रात्री 11 च्या दरम्यान, बीडपासून Beed जवळच असलेल्या नागापूर खुर्द Nagpur Khurd गावात घडली आहे.

राम साळुंके Ram Salunke वय 50 व लक्ष्मण साळुंके Lakshman Salunke वय 47 अशी मयत भावंडाची नावे आहेत. गावातील परमेश्वर साळुंके यांनी पंधरा दिवसापूर्वी मयत दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती. तेव्हा हा वाद आपसात मिटला होता.मात्र पुन्हा काल रात्री परमेश्वरनं मयत भावांना फोनवरून शिवीगाळ केली होती.

हे देखील पहा -

यामुळं त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण दोघे भाऊ गेले होते. यावेळी भर रस्त्यावर परमेश्वर साळुंके यांनी, राम आणि लक्ष्मण या दोघा भावंडांवर कुऱ्हाडीने सपासप वार करुन त्यांची हत्या केली. तर या घटनेला अंजाम देऊन, आरोपी परमेश्वर साळुंके हा फरार झाला आहे.

या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फरार आरोपी परमेश्वर साळुंके याचा तपास करण्यासाठी,त्याच्या वडिलांसह भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. दरम्यान फरार आरोपी परमेश्वर साळुंकेला लवकरच ताब्यात घेऊ.अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com