भायखळ्यात डोक्यात दगड टाकून महिलेचा खून

भायखळ्यात डोक्यात दगड टाकून महिलेचा खून
Bhaykhala

मुंबई : महिलेच्या Woman डोक्यात दगड टाकून खून Mureder करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई भायखळा Byculla पोलिसांनी Police १९ मे रोजी केली आहे. खून करून आरोपी गावी यूपीला UP पळून जाण्याच्या तयारीत होता. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केल्यामुळे वरिष्ठांनी पोलीस पथकाचे आभार मानले. Murder of Woman In Byculla

सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भायखळा पोलिसांचे पथक कर्तव्य बजावत असताना मुंबई Mumbai पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातून महिलेवर हल्ला झाल्याची माहिती बिनतारी संदेशाद्वारे प्राप्त झाली.

 हे देखील पहा -

त्यानुसार भायखळा पोलिसांनी तात्काळ  मासिना हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलच्या बाहेरील फूटपाथवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याच अवस्थेत तिला जे जे रुग्णालयात पोलिसांनी नेले. मात्र त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी ( गु र क्र 319/2021) भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला.  Murder of Woman In Byculla

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याच्या घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखील नव्हता. अशा स्थितीत पोलिसांनी तपास सुरू केला व यश देखील मिळवले.

तपासादरम्यान आरोपी उत्तर प्रदेशातील मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपीचा कसोशीने शोध घेऊन तो त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याचा तयारीत असताना भायखळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी संतोष राम किशोर यादव याला ताब्यात घेतले.Murder of Woman In Byculla

त्याची कसून चौकशी केली असता त्याने महिलेचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी हा रोडसाईड असून त्याचा मुंबईतील कोणताही कायमचा रहिवासी पत्ता नसल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्ह्याची उकल सहाय्यक पोलीस आयुक्त पवार, भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरेकर, पोलीस उपनिरीक्षक रूपेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, वाडिले, पाटील, तोडसे, कलदागी, सावंत, बोरसे, दिवटे, ठाकूर, साळुंखे, उचले आदी पथकाने केली.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com