प्रणिती शिंदेंना धमकी

प्रणिती शिंदेंना धमकी


सोलापूर: जो माणूस पंतप्रधानांना इथे आणू शकतो, तो काहीही करू शकतो,' अशी धमकी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिली. ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापूरामध्ये आणण्याची ताकद ठेवतो तो कोणालाही तुरुंगामध्ये घालू शकतो,’ असं आडम मास्तर आपल्या भाषणात म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझ्यावर १७० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असून हा आकडा २०० झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असंही सांगितलं. ‘हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत,’ असे वक्तव्यही आडम यांनी केले. आडम यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  'महाराष्ट्रात माझ्या इतके गुन्हे कुणावर आहेत? तुमच्यावर फक्त पाच गुन्हे दाखल झालेतर लटपटायला लागता. तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही. 

आडम म्हणाले, 'वृत्तपत्रांनी काही दिवसांपूर्वी छापले नरसय्या आडम यांच्यावरील गुन्ह्यांत वाढ झाली. इतर सर्वांच्या संपत्तीत वाढ झाली आणि माझ्यावरील गुन्ह्यांत. माझ्यावर १७५ गुन्हे वाढलेत. माझ्यावर २०० गुन्हे दाखल झाले तरी चालतील. माझ्यावर चोरी, दरोडा, फसवणुकीचे गुन्हे नाहीत. परवानगी नसताना सभा घेणे, मोर्चे काढले, सत्याग्रह केला, धरणे आंदोलन केले, रस्ता रोको केला याचे गुन्हे आहेत. हे गुन्हे माझ्यासाठी अलंकार आहेत.'


Web Title narasayya aadam threatened praniti shinde in solapur rally

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com