चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पणजोबाला जन्मठेप... 

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पणजोबाला जन्मठेप... 
Nardhamala who tortured Chimukali was sentenced to life imprisonment

अकोला - नातीवर अत्याचार करणाऱ्या पणजोबाला पोक्सोच्या विशेष न्यायालयाने Court जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना १० नोव्हेंबर २०१८ ची असून सिव्हिल लाइन पोलिस Police स्टेशनंतर्गत येत असलेल्या परिसरातील आहे. ही नात साडेतीन वर्षाची असून, पणजोबा यादवराव अर्जुनराव डोंगरे हा घटनेच्या दुसऱ्या दिवशीपासून कारागृहात आहे. विशेष न्यायालयाने ३ लाखांचा दंड ठोठावला आहे. दीड लाख रुपये पीडित नातीला देण्याचे आदेश Order ही दिले आहे. Nardhamala who tortured Chimukali was sentenced to life imprisonment

फिर्यादी व आरोपीची मुलगी हे जवळजवळ राहत होते. फिर्यादी या साडेतीन वर्षाच्या नातीला घरी ठेवून १० नोव्हेंबर २०१८ रोजी नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. त्यानंतर आरोपी Accused हा त्या नातीला भेटला. तिच्याशी गोड बोलून तिच्यावर अत्याचार केल आहे. फिर्यादी या घरी आल्यानंतर ती पीडित मुलगी रडत होती. तिने आजीला दुखत असल्याचे सांगितले. आजीने तिला विचारले तर तिने डोंगरे आबा आले होते, असे सांगितले. 

फिर्यादी यांनी चिमुकली मुलीकडे पाहिले असता. तिची परिस्थिती योग्य नसल्याने त्यांनी थेट सिव्हिल लाइन Civil Line पोलिस स्टेशन गाठले होते. ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी यादवराव अर्जुनराव डोंगरे (वय ७२ वर्ष, रा. आसरा) यास ३७६ (२), (एफ) आणि पोक्सो ४, ५ नुसार गुन्हा दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपी यादवराव डोंगरे यास अटक केली. तेव्हापासून आरोपी हा जिल्हा कारागृहात Jail आहे. Nardhamala who tortured Chimukali was sentenced to life imprisonment

 हे देखील पहा 

याप्रकरणी पोक्सो विशेष न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले गेले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली आहे. पोक्सो विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी याप्रकरणी आरोपी यादवराव डोंगरे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच तीन लाखांचा दंड सांगण्यात आले आहे. दंड न भरल्यास ६ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. दंडातील दीड लाखांची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायाधीश यांनी दिले आहे. सरकारी पक्षातर्फे सहाय्य्क सहकारी वकील Lawyer ऍड. मंगला पांडे यांनी काम पाहिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com