शशिकांत शिंदे मराठा आहेत का ? नरेंद्र पाटील यांची शशिकांत शिंदेंवर सडकून टीका

शशिकांत शिंदे मराठा आहेत का ? नरेंद्र पाटील यांची शशिकांत शिंदेंवर सडकून टीका
Saam Banner Template (3)

सातारा : मराठा आरक्षणाच्या Maratha reservation निर्णया विरोधात साताऱ्यात Satara दोन युवकांनी राष्ट्रवादी NCP कार्यालयाची तोडफोड केली होती. या घटनेचा जाब विचारण्यासाठी आ. शशिकांत शिंदे थेट त्या मुलांच्या घरी पोहचले आणि त्यांच्या घरच्यांना दमबाजी केली आहे. Narendra Patil criticizes whether Shashikant Shinde is a Maratha

या घटनेचा व्हीडीओ Video व्हायरल Viral झाला. नंतर अण्णासाहेब पाटील Annasaheb Patil महामंडळाचे मा. अध्यक्ष नरेंद्र पाटील हे साताऱ्यात आले.  त्यावेळी त्यांनी आ.शशिकांत शिंदें यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

हे देखील पहा -

शशिकांत शिंदे हे नक्की मराठा आहेत का ? असा सवाल उपस्थितीत केला आहे. तसेच ज्या तरुणांनी ही तोडफोड केली  त्यांच्या पाठीमागे समाज म्हणून मी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले आणि त्यांना झालेल्या दमबाजी बाबत सातारच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. या कुटुंबाला पोलीस Police संरक्षण द्यावे ही मागणी देखील त्यांनी या वेळी केली आहे. 

नरेंद्र पाटील यांच्या टीके बाबत आ. शशिकांत शिंदेंना Shashikant Shinde विचारले असता. त्यांनी मी त्या मुलांच्या घरी जाऊन दम दाटी केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.  या  वेळी बोलत असताना शशिकांत शिंदे म्हणाले की, मी त्यांच्या टीकेला महत्व देत नाही. मी कुणाला ही दम दिला नाही, मी समजून सांगण्यासाठी तिथे गेलो होतो. मी मराठा आहे का नाही ते मला माहितीये आणि मराठा समाजातील सर्व नेत्यांना सुद्धा माहीती आहे. असे स्पष्टीकरण शशिकांत शिंदेंनी दिले आहे. 

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com