राष्ट्रवादी युवतींचं 'स्मार्ट सिटी'च्या खड्ड्यात उतरून आंदोलन...

राष्ट्रवादी युवतींचं 'स्मार्ट सिटी'च्या खड्ड्यात उतरून आंदोलन...
Nationalist youth agitate against Smart City work

सोलापूर : शहरात स्मार्ट सिटी Smart City अंतर्गत रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी चालू आहेत. जी अर्धवट आहेत, ती कामे रहदारीच्या ठिकाणी आहेत. ती ताबडतोब पूर्ण करण्यात यावीत. यासाठी राष्ट्रवादी NCP युवतींकडून खड्ड्यांमध्ये उतरून आंदोलन करण्यात आलं आहे.

नुकतंच कांही दिवसांपूर्वी अशा अर्धवट रस्त्यांमुळे एका 13 वर्षाच्या बालकाला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवतींकडून देण्यात आला आहे.

हे देखील पहा 

यावेळी राष्ट्रवादी युवतींनी 'स्मार्ट सिटी','स्मार्ट सोलापूर Smart Solapur', 'स्मार्ट अधिकारी Smart officer' अशा आशयाच्या फलकांना Board पुष्पहार घालून नारळ फोडून आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध केला आहे. दरम्यान,स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवतींनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com